पैठण येथे अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे दहावीच्या गुणवंतांचा सत्कार

Foto
पैठण, (प्रतिनिधी)   :  अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी सई शैलेश आंबेकर, शार्दुल सोमनाथ उज्जैनकर, ईश्वरी अमोल जोशी, अनुष्का अरविंद जोशी, प्रार्थना पुरुषोत्तम पाठक, वरद निलेश नाईक, कौस्तुभ उदय कुलकर्णी कौशल महेश मांडे या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करावे, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या.

कार्यक्रमास अखिल भारतीय पेशवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष उपेंद्र मुधलवाडकर तसेच ज्येष्ठ नागरिक शहराध्यक्ष पोपटराव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मान्यवरांनी सांगितले